Thursday, 30 April 2020

Jai Jai Maharashtra Maza lyrics in Marathi

The song Jai Jai Maharashtra Maza that sings paeans of the State of Maharashtra was penned by well-known poet Raja Badhe.  

The words of Jai Jai Maharashtra Maza in Marathi are as follows-


जय जय महाराष्ट्र माझा, 
  गर्जा महाराष्ट्र माझा || धृ ||

रेवा, वरदा, कृष्णकोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
                   भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा  || १ ||

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
                दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा    || २ ||

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
दारिद्रच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा || ३ || 

No comments:

Post a Comment